News18 Lokmat

...नाहीतर मराठा समाजासह ओबीसींना काही मिळणार नाही -भुजबळ

ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 17 टक्के आले आता मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ओबीसीमध्ये येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 08:14 PM IST

...नाहीतर मराठा समाजासह ओबीसींना काही मिळणार नाही -भुजबळ

 


सागर कुलकर्णी, प्रतिनिधी


मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यात 50 टक्केची मर्यादा ओलांडून 52 टक्के आरक्षण आहे. जर मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ओबीसी समाजात येतील. त्यामुळे सरकारने आरक्षण देताना काळजी घ्यावी असा सल्ला माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारला दिला.

Loading...


न्यूज१८ लोकमतशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण देण्यावर चिंता व्यक्त केली. राज्यात 50 टक्केची मर्यादा ओलांडून 52 टक्के आरक्षण आहे. हे वरील दोन टक्के आरक्षण गोवारी आणि कोष्टी समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो कोर्टाने मान्य केलेला नाही. त्यामुळे ते ओबीसीमध्ये आले. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 17 टक्के आले आता मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ओबीसीमध्ये येणार आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण देताना काळजी घ्यावी असं मी विधानसभेत सांगितलं असं भुजबळ म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मराठा समाजालाही काही भेटणार नाही आणि ओबीसी समाजालाही काही भेटणार नाही अशी चिंताही भुजबळांनी व्यक्त केली.


वैद्यकीय प्रवेशासाठीच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकात 50 टक्क्यांवरील 2 टक्के आरक्षण लागू नसल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी आठवणही भुजबळांनी करून दिली.


दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका सुरूच आहे. आज सकाळी होणारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक रात्री 9 वाजता पार पडणार आहे. तसंच एटीआर देखील आजऐवजी उद्याच विधीमंडळात दाखल केलं जाईल. त्यामुळं आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.


तर दुसरीकडे मराठा संवाद यात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते हे सरकारचे दलाल असल्याचा गंभीर आरोप मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. तसंच सरकारने जर कायद्यात टिकणाऱ्या आरक्षणाची घोषणा केली तर अधिवेशनात गनिमी काव्याने अधिवशेनात घुसू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला.


=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...