मुंबई, 10 डिसेंबर : मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Ikbal singh chahal) यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल.
मुंबईचे आयुक्त म्हणाले की, परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सलग 8 दिवसांपासून ही संख्या वाढलेली आहे. बुधवारी (9 डिसेंबर) 5 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17 लाख 42 हजार 191 एवढी झालीय. तर 4 हजार 981 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 18 लाख 64 हजार 348 एवढी झाली आहे. दिवसभरात 75 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे. त्यासाठी काय करता येईल यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे.