Home /News /mumbai /

ऑस्कर विजेत्या Slumdog Millionaire फेम अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू

ऑस्कर विजेत्या Slumdog Millionaire फेम अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू

Slumdog Millionaire या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री रुबीना अलीच्या वडिलांचं निधन झालं.

  मुंबई, 31 जानेवारी :  Slumdog Millionaire या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री रुबीना अलीच्या वडिलांचं निधन झालं. 30 जानेवारीला रुबीनाचे वडील रफीर कुरैशी यांनी अखेरचा श्वास घेतला. रफीक कुरैशी गेल्या काही दिवसांपासून Tuberculosis या आजाराने त्रस्त होते. वांद्रे या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रुबीना आपल्या आईसोबत नालासोपारा याठिकाणी वास्तव्यास आहे तर तिचे वडील त्यांची दुसरी पत्नी आणि 5 मुलांसोबत वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. 10 वर्षांची असताना रुबीनाला Slumdog Millionaire मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तिने या चित्रपटात छोट्या लतिकाचं काम केलं होतं. जय हो ट्रस्टने दिलेलं रॉयल कोर्ट बिल्डिंगमधील घर सोडून ती सध्या नालासोपाऱ्यात राहत आहे.
  सध्या बीएचं शिक्षण घेत असणाऱ्या रुबीनाचं बॉलीवूड स्टार बनण्याचं स्वप्न आहे. फॅशन डिझाइनचं शिक्षणही रुबीना घेत आहे. याशिवाय ती एका मेकअप स्टुडिओमध्ये पार्ट टाइम नोकरी करत आहे. मात्र आता तिची स्वप्न पूर्ण होताना तिचे वडील तिच्यासोबत नसणार आहेत, याचीच तिला खंत आहे.
  2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले होतेच त्याचप्रमाणे समीक्षकांकडूनही प्रशंसा मिळवली होती. या चित्रपटाने 8 अकादमी पुरस्कार मिळवले होते. तर ए. आर रेहमान यांनी या चित्रपटासाठी 'Best Original Score'चा पुरस्कार आणि 'जय हो' या त्यांच्या गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जिंकला होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Oscar, Slumdog millionaire

  पुढील बातम्या