मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतील ‘या’ दुकानात मिळतात अस्सल कोल्हापुरी चप्पल, सेलिब्रेटीही करतात खरेदी पाहा, Video

मुंबईतील ‘या’ दुकानात मिळतात अस्सल कोल्हापुरी चप्पल, सेलिब्रेटीही करतात खरेदी पाहा, Video

X
Kolhapuri

Kolhapuri chappal : मुंबईतील ‘या’ दुकानात अस्सल कोल्हापुरी चप्पल मिळतात. या दुकानातून सेलिब्रेटीही खरेदी करतात.

Kolhapuri chappal : मुंबईतील ‘या’ दुकानात अस्सल कोल्हापुरी चप्पल मिळतात. या दुकानातून सेलिब्रेटीही खरेदी करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नुपूर पाटील, प्रतिनिधी

    मुंबई, 30 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या तांबड्या पांढऱ्या रस्स्याची ख्याती जशी सर्वदूर आहे तसंच आणखी एका वस्तूसाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल. सुबक नक्षिकाम आणि अनोखा आकार असल्यामुळे चप्पलांमधील हा प्रकार इतरांपेक्षा बऱ्याच अर्थानं वेगळा ठरतो. आज कोल्हापूरात बनलेल्या कोल्हापुरी चप्पलला देशभरासह परदेशातही मागणी वाढली आहे. मुंबईच्या दादरमार्केटमध्येही अस्सल कोल्हापुरी चप्पलच दुकान आहे. या दुकानात पुरुषांचे कोल्हापुरी चप्पलचे वेगवेगळे प्रकार मिळतात.

    कशी असते कोल्हापुरी चप्पल?

    मुंबईच्या दादरमार्केटमध्ये चंद्रकांत चप्पल मार्ट आहे. येथे मिळणारे चप्पल कोल्हापूर येथे बनतात. त्यामुळे त्याला प्रॉपर कोल्हापुरी लूक दिला जातो. सुबक आकार, नक्षीकाम, टिकाऊपणा यामुळे कोल्हापुरी चप्पल खुप प्रसिद्ध आहे. ही चप्पल सपाट असते. या चप्पलला मध्यभागी एक पट्टी असून एक अंगठा असतो. चामड्याचा पृष्टभाग असतो तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे सोल असते. या चपलांचा आवाज येतो कारण त्यात विंचूफळ असते. पूर्वी शेतात पाणी वळवायला जाताना साप, विंचू जवळ येऊ नयेत म्हणून. हे फळ या चप्पलमध्ये टाकलं जायचं.

    कोणते प्रकार आहेत कोल्हापुरी चप्पलचे?

    कोल्हापुरी चप्पलचे विविध प्रकार आहेत. या चप्पलचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे सुद्धा आहेत. डबल वादी, सिंगल वादी, पॉईंटेड, शाहू, पुणेरी शेप, सेनापती कापसी, कुरुंदवाड, मोजडी, कुशन कोल्हापुरी हे कोल्हापुरी चप्पल वेगवेगळ्या पॉलिशमध्ये पाहायला मिळतात.

    सेलिब्रेटी, राजकारणीसुद्धा करतात येथून खरेदी

    कोल्हापुरी चप्पल वापरायला सगळ्यांनाच आवडतं. नेते, सेलिब्रेटी येथूनच चप्पल खरेदी करतात. अभिनेता नाना पाटेकर, सतीश कुळेकर, प्रसाद ओक असे अनेक कलाकार मंडळींचं हे आवडत दुकान आहे.

    Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video

    किती रुपयांना आहेत चप्पल?

    500 ते 1600 रुपयांपर्यंत या दुकानात चप्पल उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकारनुसार या ठिकाणी चप्पलची किंमत वेगवेगळी आहे, असं दुकानातील विक्रते यांनी सांगितले.

    गूगल मॅपवरून साभार

    कुठे आहे हे दुकान?

    चंद्रकांत चप्पल मार्ट रानडे मार्ग, निअर कबुतर खाना, दादर पश्चिम, दादर, मुंबई, महाराष्ट्र 400028

    First published:
    top videos

      Tags: Kolhapur, Lifestyle, Local18, Mumbai, Shopping