S M L

भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबापुरीत शक्तीप्रदर्शन

वर्धापनदिन निमित्ताने मुंबईच्या वांद्रे कुर्ला मैदानावर भव्य सभेच आयोजन करण्यात आलंय

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2018 09:19 AM IST

भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबापुरीत शक्तीप्रदर्शन

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई 06 एप्रिल : भाजपचा वर्धापन दिन 6 एप्रिलला देशभरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात येतोय. 20 राज्यातील सत्ता आणि 11 कोटी सदस्य सदस्य आणि देशाच्या 70 टक्के भूभागावर भाजप प्रणित शासन सत्तेवर आहे. भूतकाळात कधी नव्हे ते अच्छे दिन भाजपला आले आहेत. याच भाजपचा वर्धापनदिन 6 एप्रिल ला साजरा होतोय. त्यातही आगामी लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर या वर्धापनदिनला विशेष महत्व आहे.

वर्धापनदिन निमित्ताने मुंबईच्या बांद्रा कुर्ला मैदानावर भव्य सभेच आयोजन करण्यात आलंय. केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता, आणि सभाच्या नियोजनात पारंगत असलेल्या भाजपने या सभेचं नियोजन भव्य दिव्य केलंय. बीकेसीची सातही मैदान सभेसाठी घेण्यात आली आहेत. 3 भव्य स्टेज, त्यात प्रमुख व्यासपीठ, डाव्या बाजूला आमदार खासदार आणि मंत्र्यांसाठी व्यासपीठ उजव्या बाजूला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ असणार आहे. या तिन्ही व्यासपीठाला जोडणारे 7 मंडप बांधण्यात आले आहेत. अंदाजे 3 लाख लोकं बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  28 ट्रेन आणि प्रत्येक मतदार संघातून अंदाजे 200 कार असं नियोजन करण्यात आलंय.

सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 12 वाजता केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अपेक्षित आहे. या नंतर 4 वाजता अमित शहा पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर भाजपचे राज्यातील खासदार आणि आमदारांची बैठक होणार आहे.



भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत काही बैठकी होताय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार बाबत आढावा, राज्यात पक्षच्या कार्यालय बांधकामांना होत असलेली दिरंगाई, बूथ रचना बाबत आढावा, लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी च्या नावावर चर्चा यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे

एकूणच काय आगामी लोकसभा निवडणुकीच रणशिंग या मेळाव्यातून फुंकल जाणार हे निश्चित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 09:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close