फ्लिपकार्टवरुन मागवला कॅमेरा मात्र निघाले निरमा साबण

फ्लिपकार्टवरुन मागवला कॅमेरा मात्र निघाले निरमा साबण

किरण आणि त्याच्या परिवारानं गुढीपाडव्याच्या दिवशी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन एसएलआर कॅमेरा बुक केला

  • Share this:

05 एप्रिल : ऑनलाईन साईट वरून मागवलेल्या कॅमेराच्या बॉक्समध्ये चक्क निरमा साबण निघाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे.

अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहणाऱ्या किरण पाटे याचा लहान भाऊ अक्षय याला फोटोग्राफीत करिअर करायचं आहे. त्यासाठी किरण आणि त्याच्या परिवारानं गुढीपाडव्याच्या दिवशी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन एसएलआर कॅमेरा बुक केला. सोबतच फायनान्स कंपनीच्या कार्डवरुन ३१ हजार रुपयांचा भरणाही केला. यानंतर ३० मार्च रोजी किरण घरी नसताना कुरियर कंपनीच्या एका तरुणाने त्यांच्या घरी पार्सल आणून दिलं. नवीन कॅमेरा आल्याच्या उत्साहात पाटे कुटुंबियांनी हे पार्सल उघडलं आणि त्यांना धक्काच बसला, कारण कॅमेराच्या बॉक्समध्ये चक्क निरमा साबण निघाले. यानंतर किरणने कुरिअर कंपनीसह फ्लिपकार्ट कंपनीशी संपर्क साधला, मात्र उडवाउडवीची उत्तरं मिळाली.

आता कुरियर कंपनीसह ऑनलाईन शॉपिंग कंपनीनेही हात वर केले आहेत. त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न या तरुणाला पडलाय. किरणच्या घरी जो मुलगा पार्सल घेऊन आला होता, त्यानं अत्यंत घाईगडबडीत पार्सल सोपवून पोबारा केला, यावेळी त्याने सही सुद्धा घेतली नाही, तसंच नंतर संपर्क साधला असता आपल्याच मुलाला धमक्या देण्यात आल्याचा आरोप किरणच्या आई मंदा पाटे यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 09:41 PM IST

ताज्या बातम्या