प्रशांत परिचारकांच्या निलंबनावरून सभागृहात आजही गदारोळ, निलंबनावर शिवसेना ठाम

प्रशांत परिचारकांच्या निलंबनावरून सभागृहात आजही गदारोळ, निलंबनावर शिवसेना ठाम

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून त्यांचं निलंबन झालं होतं पण सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक झालीय.

  • Share this:

6 मार्च : विधिमंडळात आजही प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून गदारोळ झाला, विधानसभा सुरू होताच शिवसेना आणि राष्ट्रवादीने हा मुद्दा उचलून धरत प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली,त्यावर सरकारने कामकाजाच्या शेवटी यावर स्पष्टीकरण द्यावं, असे निर्देश सभापतींनी दिलेत.

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून त्यांचं निलंबन झालं होतं पण सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक झालीय. पण यासंबंधीचा विरोधाभास म्हणजे जी शिवसेना परिचारकांवर कारवाईची मागणी करतेय त्याच शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचा समावेश असलेल्या विधीमंडळ समितीने परिचारक यांचं निलंबन मागे घेण्याची शिफारस केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...