'सरकार पडण्याचा मुहूर्त बघतच विरोधकांचा वेळ गेला'; उद्धव ठाकरे-अजित पवारांनी घेतला समाचार

'सरकार पडण्याचा मुहूर्त बघतच विरोधकांचा वेळ गेला'; उद्धव ठाकरे-अजित पवारांनी घेतला समाचार

राज्य सरकारच्या कामाबाबत माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : राज्य सरकारच्या कामाबाबत माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. 'सरकार कधी पडणार यांचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला. जनतेमध्ये सरकार विषयी नाराजी नाही. राज्यात अघोषित आणीबाणी आहे तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?' असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारही यावेळी भाजपविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत जनतेचा कौल मिळाला. जनता विरोधात असती तर निकाल असे लागले नसते,' असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद, जाणून घ्या ठळक मुद्दे :

- केंद्र सरकारने जीएसटीचा निधी अद्याप दिला नाही. कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ सारखी संकट पण केंद्राकडून मदत नाही

- मराठा आरक्षण चर्चा सुरू, कोर्टात बाजू मांडली जात आहे

- ओबीसी समाजात गैरसमज पसरविण्याचं काम काहीजण करत आहेत. ओबीसी आरक्षण कमी होणार नाही

- सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम विरोधी पक्षाने करू नये

- ओबीसी समाजाला डिवचण्याचं काम केले जात आहे

- भाजपकडून अन्यदात्याला देशद्रोही ठरवले जाणे चुकीचं

- पाकिस्तानातून कांदा  साखर तुम्हा आणली आणि आता शेतकऱ्यांना पाकिस्तानी ठरवता?

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या