शहा-ठाकरे भेटीवर विरोधकांची खवचट ट्विट्स!

शहा-ठाकरे भेटीवर विरोधकांची खवचट ट्विट्स!

अमित शहांनी उद्धव यांच्या हातात हात देताना सांभाळून रहावं, नाहीतर सवयीप्रमाणं उद्धव शिवबंधन बांधतील, असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणालेत.

  • Share this:

मुंबई, 06 जून : अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर विरोधकांनी खवचट ट्विट्स केलीयेत. अमित शहांनी उद्धव यांच्या हातात हात देताना सांभाळून रहावं, नाहीतर सवयीप्रमाणं उद्धव शिवबंधन बांधतील, असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणालेत.

तर खऱ्या समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच शहांच्या भेटीचा एवढा बाऊ केला जातोय, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय.

तर काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही खोडसाळ ट्विट केलंय. अफझल खान उंदिर यांची गळाभेट होणार तर असं त्यांनी म्हटलंय.

मनसेचे अनिल शिदोरेंनी म्हटलंय मोदी-शहांच्या काळात महाराष्ट्रावर बराच अन्याय झालाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 12:12 PM IST

ताज्या बातम्या