विरोधी पक्षनेत्याला वाहतूक कोंडीचा फटका, लोकलने करावा लागला प्रवास

विरोधी पक्षनेत्याला वाहतूक कोंडीचा फटका, लोकलने करावा लागला प्रवास

दिवा येथे पुर्व नियोजित कार्यक्रमाकरता विधान वरीषद विरोधी पक्ष नेते यांना आज जायचे होते... 

  • Share this:

ठाणे,24 जानेवारी:विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. यामुळे प्रवीण दरेकर यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत कार्यक्रमाला जावं लागलं.लोकल ट्रेनची गर्दी काय असते ते नेते मंडळींना चांगलेच कळाले असेल.

दिवा येथे पूर्व नियोजित कार्यक्रमाकरता प्रवीण दरेकर निघाले होते. मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंब्रा बायपास ते दिवा असा प्रवास दरेकर यांना करायचा होता. मुंबई ते ठाणे ते आपल्या ताफ्या सहित विरोधी पक्ष नेते ठाण्यात आले मात्र आधीच मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला होता. त्यात ठाण्यात भाजपा आमदार आणि नेते मंडळी त्यांच्या स्वागताकरता उभे होते. प्रवीण दरेकर हे नेते मंडळींजवळ पोहोचताच ठाणे ते दिवा मोठी वाहतूक कोंडी असल्याचे ठाण्यातील भाजप नेत्यांनी सांगितल्यावर दरेकर यांनी कपाळावर हात लावत आता पर्याय काय असं विचारलं. शेवटी लोकल ट्रेनने जाण्याशिवाय दुसरा पर्याय भाजप नेत्यांना दिसत नव्हता. पण रात्रीची वेळ चाकरमानी मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासावर असतील, हे दरेकरांच्या लक्षात आले. पण पर्याय नसल्याने शेवटी प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आपल्या नेते मंडळींसह धीम्या लोकलने गर्दीने भरलेल्या ट्रेनने दिव्याकडे निघाले.

दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याचे सरकारचे प्रयत्न म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवणे आणि त्यांचे खच्चीकरण करणे होय असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर पूर्वाश्रमीचे मनसेचे आमदार असलेले प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या नवीन झेंड्यावरील राजमुद्रेबाबत राज ठाकरे यांचे समर्थन केलं आहे. आमच्या सरकारचे सर्व निर्णय चुकीचे ठरवण्याचे दुर्दैवी काम विद्यामान सरकार करतय अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली. CAA आणि NRC च्या विरोधात जेवढे मोर्चे निघतायेत त्यापेक्षा जास्त भारतीय जनतेने या निर्णयाचे स्वागत केलं. शिवाय राज ठाकरे यांनी CAA आणि NRC बाबत मोदींना दिलेल्या पाठिंब्याचे दरेकर यांनी स्वागत केलं आहे. कोकणातील मतदारांनी शिवसेनेला नेहमी मत देतील, मात्र आता कोकणाला काही पॅकेज द्यायचे म्हटले की शिवसेनेने हात अकडता घेतला हे दुर्दैव आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

First published: January 24, 2020, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading