Home /News /mumbai /

‘उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे द्वेष व असूयेचा दुसरा अंक’, भाजपचा हल्लाबोल

‘उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे द्वेष व असूयेचा दुसरा अंक’, भाजपचा हल्लाबोल

'पण या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची ताकद काय आहे आणि सरकार कसे हलले आहे हे दर्शवते.'

मुंबई 25 जुलै: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. या मुलाखतीत द्वेष व असूयेचा दुसरा अंक पाहायला मिळाला. पहिला अंक हा शरद पवार (Sharad Pawar)साहेबांची मुलाखत होता. पण या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची ताकद काय आहे आणि सरकार कसे हलले आहे हे दर्शवते असंही दरेकरांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, त्यावरून सुरु असलेलं राजकारण आणि विरोधीपक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. आता त्यावरून पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली आहे. या आधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी फडणवीसांना टोले हाणले होते. भाजपने पवारांच्या मुलाखतीवरही टीका केली होती. विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जाऊन भेटतात यावर ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व नेत्यांना परिस्थिती सांगितली आणि मोकळेपणाने काही त्रुटी असल्यास सांगा असं आवाहन केलं होतं. सगळंच काही व्यवस्थित आहे असा माझा दावा नाही. कुठे काही कमतरता राहिल्यास विरोधी पक्षांनी सांगितल्यास त्या त्रुटी दूर करता येतील. मात्र त्यांना त्यात रस नसून राजकारण करायचे आहे असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. हे वाचा - मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर तर वारंवार पत्र पाठवून सरकार आपल्या पत्रांची दखलच घेत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. काय म्हणाले होते मुख्यमंत्री? 'महाराष्ट्र कोरोनाच्या परिस्थिती त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसंच, 'राज्याने आपला मुख्यमंत्री निवडला हीच त्यांची पोटदुखी असेल', असा टोलाही त्यांनी लगावला होता. हेही वाचा -महाराष्ट्रात कायमचा लॉकडाउन कधी उठणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट फडणवीसांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,'  फडणवीस हे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले होते. फडणवीस हे दिल्लीतील  तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील. पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले नाहीत ते. दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत.' असा सणसणीत टोला फडणवीसांना लगावला होता.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav thackeray

पुढील बातम्या