S M L

जनतेच्या हातात भोपळा,जनतेच्या पाट्या कोऱ्या, विरोधकांनी केला अर्थसंकल्पाचा निषेध

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर हातात भोपळा आणि कोऱ्या पाट्या घेऊन घोषणाबाजी केली. तर आतापर्यंतचा हा सर्वात निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Sonali Deshpande | Updated On: Mar 9, 2018 06:34 PM IST

जनतेच्या हातात भोपळा,जनतेच्या पाट्या कोऱ्या, विरोधकांनी केला अर्थसंकल्पाचा निषेध

09 मार्च : जनतेच्या हातात भोपळा आणि जनतेच्या पाट्या कोऱ्या, अशा शब्दात विरोधकांनी अर्थसंकल्पाचा निषेध केलाय. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर हातात भोपळा आणि कोऱ्या पाट्या घेऊन घोषणाबाजी केली. तर आतापर्यंतचा हा सर्वात निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यंदाही अर्थमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली. त्यांनी शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे संकल्प जाहीर केले. अर्थमंत्र्यांनी शिवरायांचे नाव वापरून अर्थसंकल्पाला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी शिवाजी महाराजांची उंची कमी केली आहे. हे सरकार राज्याच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. त्यामुळेच आपले अपयश लपवण्यासाठी सरकारला वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करावा लागतो, अशी बोचरी टीका विखे-पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close