मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यपालांच्या आड भाजप आणते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा, नाना पटोलेंचा थेट आरोप

राज्यपालांच्या आड भाजप आणते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा, नाना पटोलेंचा थेट आरोप

'राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे.

'राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे.

'राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 डिसेंबर :  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून ( Assembly Speaker Election) महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल (governor bhagat singh koshyari)  यांच्यात संघर्ष पेटला आहे. तर  'आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही. राज्यपालांच्याआडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून अडथळा आणत आहे, असा आरोपच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

'नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल,असं पटोले म्हणाले.

(हेही वाचा - शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, कोर्टात उद्या फैसला)

तसंच, 'राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजप सरकारने लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणुक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहित आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

'महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

तर, कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली आहे तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप त्या कालीचरण बाबाने केले आहे. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी, अशी मागणीही पटोलेंनी केली.

First published: