'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्यानं भाजपकडून दबाव निर्माण केला जातोय असं शिवसेनेला वाटतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 05:42 PM IST

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

मुंबई 2 सप्टेंबर : एकीकडे भाजप सेनेची युती होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे सगळे नेते म्हणत असताना युती संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेत असतात असं वक्तव्य शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय. तसंच आमच्याकडे चर्चा करण्याची पद्धत नसून आवडो किंवा न आवडो पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो अंतिम असतो असं रावते यांनी म्हटलंय. भाजपच्या नेत्यांना उत्तर म्हणून रावते यांनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातंय. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्यानं भाजपकडून दबाव निर्माण केला जातोय असं शिवसेनेला वाटतं. त्यामुळे रावते यांनी हे वक्तव्य केलं असण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेचं मनोमिलन झालं. त्यावेळी यापुढे सर्व निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असं भाजपकडून सांगितलं गेलं.

'युती असल्याने इनकमिंगला मर्यादा पण लवकरच होणार मेगाभरती'

आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर युती होणार की नाही याबद्दल शंका निर्माण केली जातेय. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये स्वबळावर निवडणूक लढल्यास बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. त्यामुळे भाजप ऐनवेळी स्वबळाचा नारा देऊ शकते असंही बोललं जातंय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनीदेखील युती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असं सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवर रावतेंच्या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त झालंय.

अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटकेची टांगती तलवार

Loading...

फडणवीसच मुख्यमंत्री होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात काय केलं त्याचा जाहीर खुलासा करावा आम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगू असं जाहीर आवाहनच दिलं. सभा संपताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतदान करा असं आवाहन करत शिवसेनेवर दबावही निर्माण केल्याचं बोललं जातंय.

Ganesh Chaturthi 2019: पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीला कैद्यांचं ढोलपथक

मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. सत्तेची वाटणी सम-समान होणार असंही सांगितलं जातंय. या सभेत अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचं सरकार येणार असं सांगितलं मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असंही स्पष्टपणे जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेच्या दबावाचा परिणाम होणार नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकंलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...