• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • "ज्यांना पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला", नाना पटोलेंचं पवारांना प्रत्युत्तर

"ज्यांना पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला", नाना पटोलेंचं पवारांना प्रत्युत्तर

Nana Patole on Sharad Pawar comment: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 सप्टेंबर : शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी असल्याचं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे. (Nana Patole replies Sharad Pawar) नाना पटोले यांनी म्हटलं, पवार साहेब मोठे आहेत त्यांच्याबाबत फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. पक्षावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर काँग्रेस पक्षाने अनेक लोकांना जमीन राखण्यासाठी दिली होती आणि त्यांनीच जमीन चोरली, डाका मारला, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असेल असं त्यांचं मत असेल. पण 2024 च्या निवडणुकीत देशात काँग्रेसचाच पंतप्रधान बनेल. भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. कुणाला काय बोलायचं असंल तर लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नाना पटोलेंनी पुढे म्हटलं, काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस हा जमीनदाराचा पक्ष नाहीये. ज्यांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच पक्षाचा घात केला हे सातत्याने देशभरातून आपल्याला पहायला मिळालं आहे. सामान्य जनता आजही काँग्रेससोबत आहे. देशात भाजपला एकच पर्याय तो काँग्रेसचाच आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात काँग्रेस पक्षाचाच पंतप्रधान असेल असंही नाना पटोले यांनी म्हटलं. 'पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय' - देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या स्थितीबाबत आपली भूमिका मांडली त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे. मला असं वाटतं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही. कारण काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय. असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजरान चाललं आहे तशा प्रकारचंच वर्णन शरद पवारांनी केलं आहे. पवार यांनी केलेले वर्णन चपखल लागू होणारे आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: