...तरच महिलेला मिळणार पोटगी !

...तरच महिलेला मिळणार पोटगी !

"घटस्फोटीत महिला जर निराधार असेल, तिला उत्पन्नाचा कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तरच तिला तिच्या घटस्फोटित पतीकडून सीआरपीसीच्या १२५ व्या कलमानुसार पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे"

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

21 जून : घटस्फोटीत महिला जर निराधार असेल, तिला उत्पन्नाचा कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तरच तिला तिच्या घटस्फोटित पतीकडून सीआरपीसीच्या १२५ व्या कलमानुसार पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे असा निकाल मुंबई हायकोर्टाने एका प्रकरणात दिला आहे. जस्टिस के के तातेड यांनी हा निर्णय दिला आहे.

आॅक्टोबर २०१४ साली सावंतवाडी ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेटनं एका नर्स असलेल्या महिलेला ती महिना ८ हजार रुपये कमावत असतानाही तिला दर महिना १५०० रुपये पोटगी देण्यात यावी असा आदेश दिला होता, हा आदेश हायकोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. संबंधित जोडप्याचं जून २००७ला लग्न झालं होतं त्यानंतर ती विवाहिता अवघ्या पंधरा दिवसात सासर सोडून निघून गेली होती.

त्यानंतर २०१० साली नवऱ्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला त्यावर त्याची  पत्नी कायदेशीर प्रक्रियेसाठी कोर्टात हजर न राहिल्यानं नवऱ्याचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २०१२ साली घटस्फोटित महिलेने सिंधुदुर्गाच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेत पोटगीची मागणी केली, कोर्टाने त्या महिलेच्या बाजूने निकाल दिला.

तिच्या नवऱ्यानं त्या विरोधात सेशन्स कोर्टात धाव घेऊनही त्याच्याविरोधात निकाल लागल्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल केली ज्यावर आज निकाल देण्यात आला. पतीच्या वकिलांनी संबंधित महिला महिन्याला ८ हजार रुपये कमवत असून शासनाच्या एका योजनेनुसार परिचारिका म्हणून काम करत असून घटस्फोटित पती मात्र एलआयसी एजंट म्हणून काम करत असल्यानं त्याच्या उत्पन्नाची शाश्वती नसल्याचं म्हणत पोटगीचा आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती कोर्टाला केली होती, ती कोर्टाने मान्य केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 07:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading