Home /News /mumbai /

शिवसेनेचं टेन्शन वाढलं! आमदारांची संख्या आणखी घटली, वर्षावर आता फक्त इतके MLA उपस्थित

शिवसेनेचं टेन्शन वाढलं! आमदारांची संख्या आणखी घटली, वर्षावर आता फक्त इतके MLA उपस्थित

उद्धव ठाकरे यांच्याकडील संख्याबळ सातत्याने घटताना दिसत आहे. वर्षावर बैठकीत शिवसेनेचे 14आमदार उपस्थित आहे.

मुंबई 23 जून : राज्यातील राजकीय भूकंपादरम्यान शिवसेनेच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठींबा दिला आहे. हे आमदार सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडील संख्याबळ सातत्याने घटताना दिसत आहे. वर्षावर बैठकीत शिवसेनेचे 14आमदार उपस्थित आहे. 'आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत!' शिवसेना आमदाराचा 'लेटरबॉम्ब', वाचा खळबळजनक पत्र वर्षावरील बैठकीसाठी फक्त या आमदारांची उपस्थिती - 1) अजय चौधरी 2)रवींद्र वायकर 3)राजन साळवी 4)वैभव नाईक 5)नितीन देशमुख 6)उदय सामंत 7)मा.श्री.सुनील राऊत 8)सुनील प्रभू 9)दिलीप लांडे 10)राहुल पाटील 11)रमेश कोरगावकर 12)प्रकाश फातरपेकर 13) मा. श्री उदयसिंह राजपूत 14) मा. श्री संतोष बाॅगर मतदार संघात 15) आदित्य ठाकरे मातोश्रीवरच आहेत फक्त 12 आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री मंत्रालयाला देणार निरोप? दुपारी सर्व सचिवांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक दरम्यान बंडखोर आमदारांच्या या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, या बंडखोर आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं. यांना मी बंडखोर नाही तर बदमाश म्हणेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. पुढे राऊत म्हणाले की जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Maharashtra News, Maharashtra politics, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या