• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबई लोकलचा ऑनलाईन पास काढायचाय? मग हे वाचाच

मुंबई लोकलचा ऑनलाईन पास काढायचाय? मग हे वाचाच

सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास (Universal Travel Pass) ही ऑनलाईन ई-पास प्रणाली (Online E-pass) मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उपलब्ध करून दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 ऑगस्ट : मुंबई लोकल (Mumbai local) सर्वसामान्य प्रवाशांसाठी 15 ऑगस्टपासून (15 August) सुरू होणार आहे. लसीचे दोन्ही डोस (two doses of covid-19 vaccine) घेऊन किमान 14 दिवस उलटलेल्या नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास (Universal Travel Pass) ही ऑनलाईन ई-पास प्रणाली (Online E-pass) मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीचा उपयोग करून नागरिकांना त्यांचे पास ऑनलाईन पद्धतीनं काढणं शक्य होणार आहे. काय आहे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास? मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला, तरी सरसकट सर्वांसाठी अद्यापही लोकल सुरु होणार नाही. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच सध्या मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. लसीकरण न झालेल्या, लसीचा एक डोस घेतलेल्या किंवा दुसरा लस घेऊन 14 दिवस न झालेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अद्यापही बंद आहेत. मुंबई लोकलमध्ये परवानगी नसलेल्या प्रवाशांनी घुसखोरी करू नये, यासाठी एक यंत्रणा उभारण्याचं आव्हान मुंबई महापालिकेसमोर होतं. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच केवळ पास मिळतील, अशी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न या नव्या प्रणालीत करण्यात आला आहे. https://epassmsdma.mahait.org ही लिंक ई पास काढण्यासाठी शासनाकडून देण्यात आली आहे. हे तपशील गरजेचे हा पास काढण्यासाठी प्रवाशांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सर्टिफिकेट पुरावा म्हणून अपलोड करावं लागणार आहे. त्याचप्रमाणं लस घेऊन 14 दिवस उलटले आहेत का, याची पडताळणीदेखील दुसरी लस दिल्याच्या तारखेवरून करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रवाशांना स्वतःच्या आधार कार्डाचे तपशीलही द्यावे लागणार आहेत. लसीकरण सर्टिफिकेटवरील माहिती, आधार कार्ड नंबर आणि ओटीपी यांच्या आधारे प्रवाशांचं व्हेरिफिकेन केलं जाईल आणि त्यानंतर ऑनलाईन पास जारी करण्यात येणार आहे. हे वाचा -'मार्मिक'च्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार मुंबई लोकलने प्रवासासठी ऑफलाईन लसीकरण पडताळणी प्रक्रियादेखील सुरू आहे. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन पडताळणी करून पास मिळवणंही नागरिकांना शक्य होणार आहे.
  Published by:desk news
  First published: