मुंबईत एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या

मुंबईत एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईतील वाकोल्यात घडली आहे.

  • Share this:

10 एप्रिल :  एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईतील  वाकोल्यात घडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसांनी तरुणाला जागीच पकडून अटक केली.

भर रस्त्यात संभाजी मोरे या तरुणाने चाकू हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई विद्यापीठ रस्त्यावर झालेल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संभाजीला ही मुलगी आवडायची. त्यानं तिला तसं सांगितलं, पण मुलीनं नकार दिला. याचा राग मनात धरून संभाजीनं काल तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading