मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Avighna Park Fire: महापौर किशोरी पेडणेकरांकडून घटनास्थळाची पाहणी, दिली पहिली प्रतिक्रिया

Avighna Park Fire: महापौर किशोरी पेडणेकरांकडून घटनास्थळाची पाहणी, दिली पहिली प्रतिक्रिया

Avighna Park Fire Update: रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 22 ऑक्टोबर: लालबाग (Lalbaug Mumbai) परिसरात इमारतीला भीषण आग (massive fire in residential building) लागली आहे. लोअर परिसरातील वन अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लेव्हल तीनची असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावर प्रतिक्रिया देताना महापौर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. त्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला. राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली. भीषण आग ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात दिसत आहेत. (Fire caught in Lalbaug residential building) आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 19व्या मजल्यावर लागलेली ही आग आता इमारतीच्या इतर मजल्यांवर सुद्धा पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली.
First published:

Tags: Kishori pedanekar

पुढील बातम्या