मुंबई, 18 मार्च : देशात कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबईहून (Dubai) गुहागरला (Guhagar) आपल्या घरी आल्यानंतर त्याने अनेक गावकऱ्यांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे.
16 तारखेला हा व्यक्ती गुहागरमधील आपल्या घरी आला. त्या आधी दुबईत त्याला दहा दिवस ताप खोकल्याचा त्रास होत होता. आल्या आल्या त्याने गावकऱ्यांची भेटीगाठी घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला तातडीने रत्नागिरीला पाठवलं. आज त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या प्रवाशाने सिक्यूरिटी कशी स्कीप केली. हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईत एका 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधून 21 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरीतूनही (गुहागर) 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची संख्या 45 वर गेली आहे.
आज पुण्यातून (Pune) एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतून (Mumbai) 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यात काही वेळापूर्वी पिंपरी चिचंवड येथील 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. हा रुग्ण फिलिपिन्स, सिंगापूर आणि कोलंबोचा दौरा करुन आला होता. काही वेळापूर्वी रत्नागिरीतील एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. हा रुग्ण दुबईचा दौरा करुन आला होता. मुंबईतील कोरोना पाॅझिटिव्ह महिलेनं कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) केलेला नव्हता. काल ज्या संशयित रुग्णाचा कोरोनाव्हायरस चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेला Covid-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संबंधित - आता गुन्हे नकोत! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पोलिसांचं गुन्हेगारांना आवाहन
दरम्यान, राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना गरजेचं असल्यास प्रवास करण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेक कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जात आहे. याशिवाय नागरिकांनी अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.