काँग्रेसला एकाच दिवसात दुसरा मोठा धक्का, उर्मिलानंतर आणखी एका नेत्याचा पक्षाला राम राम!

काँग्रेसला एकाच दिवसात दुसरा मोठा धक्का, उर्मिलानंतर  आणखी एका नेत्याचा  पक्षाला राम राम!

आजच काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर हा काँग्रेसला दुसरा धक्का आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 10 सप्टेंबर : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवलाय. कुठल्या पक्षात जायचं याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सिंग हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आजच काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर हा काँग्रेसला दुसरा धक्का आहे. आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तसंच राज्यातील काँग्रेसच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर सिंग यांनी कामं आहे. संजय निरुपम यांच्या मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये ते पक्षात अस्वस्थ होते. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री गणपतीचे निमित्ताने यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. याच माध्यमातूनं ते मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत होते. त्याचबरोबर सिंग हे भाजपातील दिल्लीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी उत्तर भारतीय म्हणून संपर्कात राहिलेत.

'सचिन तेंडुलकरांनी दिलेल्या खासदार फंडाच्या निधीचा बीड पालिकेकडून गैरवापर'

भाजपने उत्तर भारतीय मास लीडर कृपाशंकर सिंग चेहरा म्हणून पुढील काळात वापरण्याचं नियोजन केल्याचंही बोललं जातंय. कृपाशंकर सिंग यांत्यावरही भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान उद्या होणाऱ्या पक्ष प्रवेशावेळी सिंग यांचा प्रवेश होण्याची शक्यता नाही. भाजपमध्ये उद्या पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. यात हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील, सत्यजित देशमुख आणि नवी मुंबईतले नेते गणेश नाईक यांचा समावेश आहे. यातील काही प्रवेश हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब इथे होणार आहे.

झालं ठरलं! काँग्रेसला बसणार हादरा, हा दिग्गज नेता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

तर नाईक यांचा प्रवेश नवी मुंबईतील वाशी इथे होणार आहे. तर आजच राजीनामा दिलेले कृपाशंकर सिंह यांचा मात्र उद्या प्रवेश होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांनी माहिती दिलीये. या प्रवेशांच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर खिंडार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:23 PM IST

ताज्या बातम्या