6 बँकांना 400 कोटींना बुडवून आणखी एक व्यापारी देश सोडून पळाला

6 बँकांना 400 कोटींना बुडवून आणखी एक व्यापारी देश सोडून पळाला

मात्र हा व्यापारी पळाला कसा याचं गुढ मात्र कायम आहे. स्टेट बँकेने चार वर्ष तक्रारीसाठी का लावले असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

  • Share this:

मुंबई 09 मे: बँकांना बुडवून देशाबाहेर पळून जाण्याची काही प्रकरणं देशभर गाजली आहेत. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनी हजारो कोटी रुपयांनी बँकांना फसवून ते देश सोडून पळून गेले. त्यानंतर देशभर प्रचंड वादळ निर्माण झालं. मात्र त्यानंतर सरकार आणि बँकांना जाग आलीच नाही. कारण आणखी एक मोठा व्यापारी 6 बँकांचे तब्बल 400 कोटींपेक्षा जास्त पैसे बुडवून देश सोडून गेल्याची धक्कादायक बाबत उघड झाली आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तांदुळाचा व्यापार करणाऱ्या रामदेव इंटरनॅशनल या कंपनीच्या मालकाने हे काम केलं आहे. स्टेट बँकेने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयने चौकशी केली तेव्हा त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. हा पैसे बुडव्या मालक हा 2016मध्येच देश सोडून पळाल्याचं सीबीआयच्या तपासात आढळून आलं आहे.

त्याने 2016मध्ये आपली कंपनी दिवळखोर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी एसबीआयने या फ्रेबुवारीमध्ये त्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीबीआयने चौकशी करून गुन्हा नोंदवला आहे. तर आपल्याकडून तक्रार दाखल करण्यास उशीर झाला नसल्याचा दावा एसबीआयने केला आहे.

अमित शहांनी प्रकृतीबाबतच्या ‘त्या’ बातम्यांवर केला मोठा खुलासा

रामदेव इंटरनॅशनल या कंपनीनं 414 कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. ज्यापैकी 173.11 कोटी स्टेट बँकेकडून, 76.09 कोटी रूपये कॅनरा बँकेकडून, 64.31 कोटी यूनियन बँक ऑफ इंडिया, 51.31 कोटी रूपये सेंट्रल बँकेकडून आणि 36.91 कोटी आणि 12.27 कोटी रूपये कॉर्पोरेशन बँक आणि आयडीबीआय बँकेकडून घेतले होते अशी माहिती पुढे आली आहे.

सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ, ‘नॅशन हेराल्ड’ प्रकरणी 16.38 कोटींची संपत्ती जप्त

या प्रकरणी सीबीआयने कंपनीच्या संचालक आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल  केला आहे. मात्र हा व्यापारी पळाला कसा याचं गुढ मात्र कायम आहे. स्टेट बँकेने चार वर्ष तक्रारीसाठी का लावले असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

 

 

 

First published: May 9, 2020, 9:14 PM IST
Tags: CBISBI

ताज्या बातम्या