मुंबईत मशिद बंदर परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबईत मशिद बंदर परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबईतील मशिद बंदर परिसरात 95 नागादेवी क्रॉस लेनवरील सैय्यद इमारतीचा काही भाग शु्क्रवारी कोसळला. ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट- मुंबईतील मशिद बंदर परिसरात 95 नागादेवी क्रॉस लेनवरील सैय्यद इमारतीचा काही भाग शु्क्रवारी कोसळला. ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून 2 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 2 ते 3 अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही इमारत निष्कासीत केली जात असताना ही दुर्घटना घडली. मृतदेह जेजे रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, या इमारतीत 3 ऑगस्टला आग लागली होती. जी 5 तारखेपर्यंत धुमसत होती.

सैय्यद इमारतीला शनिवार (3 ऑगस्ट) सकाळी भीषण आग लागली होती. आग एवढी भीषण होती की, परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम केल्यानंतरही आग 5 तारखेपर्यंत धुमसत होती. हीच इमारत निष्कासीत केली जात असताना ही दुर्घटना घडली.

वांद्रे येथे एमटीएनएलच्या नऊ मजली बिल्डिंगला आग

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील एमटीएनएलच्या नऊ मजली बिल्डिंगला आग लागली होती. बिल्डिंगमध्ये 84 जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर सगळ्यांना बाहेर काढण्यात आले होते.

डोंगरीत इमारत कोसळून झाला होता 10 जणांचा मृत्यू

डोंगरी परिसरात 16 जुलैला एक चार मजली 'केसरबाई' इमारत कोसळली होता. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. म्हाडाची ही इमारत 80 वर्षे जुनी होती. ती धोकादायक बनली होती. इमारतीमध्ये 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली 50 जण अडकली होती. अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि NDRF पथकाकडून मदत आणि बचाव कार्य करण्यात आले होते.

बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading