S M L

ठाण्यात झाडं कोसळून एका वकिलाचा मृत्यू

ठाण्यातील पाचपखाडीत उदय नगर इथं सोसायटीतील झाड पडलं

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2017 05:46 PM IST

ठाण्यात झाडं कोसळून एका वकिलाचा मृत्यू

23 जुलै : चेंबूरमध्ये झाडं कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात एका वकिलाचा झाड पडल्यामुळे मृत्यू झाला.

ठाण्यातील पाचपखाडीत उदय नगर इथं सोसायटीतील झाड पडलं. नेमक त्याच वेळी 39 वर्षाचे वकील किशोर पवार हे बाईकवरून जात होते. त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. जखमी किशोर यांना स्थानिक नागरिकांनी कौशल्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. परंतु अखेर काल सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

त्याच्यापश्चात एक मुलगा,बायको,आई आणि वडील असा परिवार आहे. स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे यांनी या बाबत ठाणे महापालिकेला म्हणजे वृक्ष प्राधिकरणाला तोंडी तक्रार केली होती. परंतु या बाबत पालिका वृक्षप्राधिकरणाने दखल न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे स्थानिक सांगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close