प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांनीच केले मुलीचे 2 तुकडे, बॅगेत ठेवला अर्धा मृतदेह

प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांनीच केले मुलीचे 2 तुकडे, बॅगेत ठेवला अर्धा मृतदेह

त्याला चार मुली आहेत. त्यातील ही मुलगी मोठी होती. त्याने राहत्या घरी त्यांनी मुलीची हत्या केली.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,9 डिसेंबर: कल्याण स्टेशन परिसरातील टॅक्सी स्टँडजवळ रविवारी पहाटे एका बॅगेत शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेचा कमरेपासून अर्धा मृतदेह बॅगेत ठेवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद तिवारी असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून महिलाचे वडीलच आहे. प्रेमसंबंध मान्य नसल्याने अरविंद तिवारी यांनीच मुलीची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या बॅगेत ठेवले. त्यातील एक बॅग कल्याण स्टेशनबाहेर ठेवली होती. तर शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे एका ठिकाणी पुरल्याचे आरोपी बापाने कबूल केले आहे.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याला चार मुली आहेत. त्यातील ही मुलगी मोठी होती. त्याने राहत्या घरी त्यांनी मुलीची हत्या केली. टोकाच्या वादात मुलीच्या शरीराचे 2 तुकडे केले. शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे पुरला तर मृतदेहाचा खालचा भाग तो कल्याण स्थानकाबाहेर ठेवला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. कसलाही ठोस पुरावा हाती नसताना केवळ 24 तासांच्या आत ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि उल्हासनगर युनिटने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका बॅगेत महिलेचा कमरेपासून अर्धा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. बॅग ठेऊन जाणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यानुसार ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि उल्हासनगर युनिटने आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. गजबजलेल्या स्टेशन परिसरात असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने केली बापाची हत्या...

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईत माहिम येथील बीचवर अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या युनिट 5 ने समुद्र किनारी सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचा छडा लावायला आहे. गुन्हे शाखेने वाकोल्यातून 19 वर्षीय तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलीनेच प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 9, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading