'पुढच्या चार दिवसांमध्ये भाजपमध्ये पुन्हा 'मेगाभरती'

'राज्यात विरोधी पक्षांची स्थिती गंभीर होईल. भाजपकडेच फक्त विकासाचं व्हिजन असल्याने सर्व नेते त्या पक्षाकडे येत आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 05:41 PM IST

'पुढच्या चार दिवसांमध्ये भाजपमध्ये पुन्हा 'मेगाभरती'

मुंबई 8 सप्टेंबर : भाजपमध्ये प्रवेशासाठी विरोधी पक्षांची रांग लागलीय. भाजप प्रवेशाची ही गर्दी कमी होण्याची शक्यता नाही अशीच चिन्हे आहेत. असं वातावरण असतानाच भाजपमध्ये येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा मेगाभरती होईल असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. राज्यात विरोधी पक्षांची स्थिती गंभीर होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. लाड यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांची चिंता वाढणार आहे. त्याच बरोबर लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

लाड म्हणाले, आरे मेट्रो कारशेडला विरोध करणं चुकीचं आहे. विकासासाठी पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सुप्रिया सुळे यांनी आज आरे मेट्रो कारशेडला विरोध करत आंदोलनात सहभाग घेतला. लाड यांनी सुळे यांच्या या भूमिकेवरही टीका केली.

चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क होण्यासाठी बाप्पाला साकडं

'उदयनराजे कुठेही असले तरी स्वागतच'

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश सध्या तरी बारगळलेला दिसत आहे. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेली ही चर्चा अद्याप थांबलेली नाही. सर्वच पक्षातील नेत्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

Loading...

'उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचं स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे. याआधीही संभाजीराजेंना उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी संभाजीराजेंनी उदयनराजे जर भाजपमध्ये जाणार असतील तर मी त्यांचं स्वागत करतो, असं म्हटलं होतं.

सरकारची अवस्था दारूड्यासारखी, प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर सर्वच पक्षात हालचाली

उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले. सर्वात आधी आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती.

उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...