S M L

मंत्रालयात कर्मचाऱ्यांचं योग दिवसाकडे 'पाठा'सन

मंत्रालय परिसरात असणारे किमान २०० अधिकारी येणे अपेक्षित आहे मात्र जितकी तयारी तितक्यापैकी ५० टक्केही आले नाही.

Sonali Deshpande | Updated On: Jun 21, 2018 01:14 PM IST

मंत्रालयात कर्मचाऱ्यांचं योग दिवसाकडे 'पाठा'सन

मुंबई, 21 जून : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे पण जिथून राज्याचा कामाचा गाडा हाकला जातो, त्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी योग दिवसाकडे पाठ फिरवलीये.आज सकाळी मंत्रायलयात योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. पण योग दिवसाकडे कर्मचाऱ्यांनी येणे टाळले.

विशेष म्हणजे, मंत्रालय परिसरात असणारे किमान २०० अधिकारी येणे अपेक्षित आहे मात्र जितकी तयारी तितक्यापैंकी ५० टक्के ही आले नाही. अखेर कॅबिनेट मंत्री महादेव जानकर आणि मुख्य सचिव डी के जैन यांच्या उपस्थितीत योग दिवस उरकण्यात आला.

दरम्यान, या दिनानिमित्त देशभरात योग उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून योगदिन साजरा केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगदिन साजरा केला आहे.

मुंबईमध्ये योग दिनानिमित्त आशिष शेलार यांनी योग शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता सहभागी झाले आहेत.

Loading...
Loading...

आजच्या या दिनानिमित्त पंतप्रधांनी  फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट (एफआरआई)च्या मैदानातून सगळ्यांना संबोधित केलं. आणि योगा दिनाच्या योगाभ्यासाचे महत्त्व सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी योग साधना केली.

आज जगातला प्रत्येक देश हा योगसाधना करत आहे. त्याने संपूर्ण विश्वाला ऊर्जा मिळणार आहे. असं मोदी म्हणाले. या आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांमध्ये बसून योगा केला. त्यामुळे योग दिवस हे आता एक आंदोलन झालं आहे. असं मोदी म्हणाले आहेत.

हेही वाचा

प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

International Yoga Day : डेहराडूनमध्ये मोदींनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केला योग

ही आहे सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 01:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close