Home /News /mumbai /

मराठा आरक्षणाला नख लावल्यास खपवून घेणार नाही, खासदार संभाजीराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाला नख लावल्यास खपवून घेणार नाही, खासदार संभाजीराजेंचा इशारा

'मराठा समाजाने प्रचंड संघर्षातून आणि त्यागातून काही गोष्टी मिळवल्यात. न्यायालय हे पुराव्यावर आधारित न्याय देते. त्यामुळे सर्व बाबी चोख असाव्यात.'

मुंबई 4 जुलै: मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 7 जुलैला सुनावणी होणार आहे. (Maratha reservation issue)  त्यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारनेही तयारी सुरू केली आहे. सरकारवर मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे. मात्र मराठा आरक्षणाला नख लावल्यास समाज कधीच खपवून घेणार नाही असा खणखणीत इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती (mp sambhajiraje chhatrapati) यांनी दिला आहे. संघर्ष आणि त्यागातून मराठा समाजाने हे आरक्षण मिळवलं आहे. त्यामुळे त्यासाठी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. खासदार संभाजीराजे म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात 7 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पूर्वतयारीची बैठक पार पडली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मला फोन करून याबाबत माहिती दिली. मी त्यांना आश्वस्त केलं, की आपण एवढ्या गांभीर्याने सर्व गोष्टी आता करत आहात तर मराठा समाज सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून सहकार्य करेल. न्यायालय हे पुराव्यावर आधारित न्याय देते. त्यामुळे सर्व बाबी चोख असाव्यात अश्या सूचना त्यांना केल्या. यावेळी सारथी संस्थेच्या बाबतही समाजाच्या भावना तीव्र असल्याचे त्यांना सांगितले. मराठा समाजाने प्रचंड संघर्षातून आणि त्यागातून काही गोष्टी मिळवल्यात. त्याला नख लावायचा कारभार समाज कधीच खपवून घेणार नाही. याबाबत तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन मराठा समाजातील प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांची बैठक घडवून आणावी, बऱ्याच गोष्टी संवादा आभावी प्रलंबित आहेत. ही गंभीर बाब आहे. यावेळी त्यांनी सर्व बाबींसाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचा, तसेच सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणी अनुषंगाने मराठा समाजातील प्रतिनिधी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लवकरात लवकर बैठक घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे, असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संपादन - अजय कौटिकवार
First published:

Tags: Chatrapati sambhajiraje bhosle, Maratha reservation issue

पुढील बातम्या