मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : 12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या भेटीला बोलावले!

BREAKING : 12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या भेटीला बोलावले!

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

12 आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेला.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 ऑगस्ट : राज्यपाल नियुक्त 12 आमदाराची यादी (MLAs appointed by Governor)  गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि काँग्रेसचे नेते उद्या 1 सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची (Governor bhagat singh koshyari)  भेट घेणार आहे.

१२ आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टाने हा निर्णय लवकर घेतला पाहिजे, असं मत नोंदवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट घेण्यासाठी आमंत्रण पाठवलं.

मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? LICमध्ये 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी?

अखेर, उद्या १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राजभवनावर जाणार आहे. यावेळी राज्यपालांसोबत आमदारांच्या यादीवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

फूटबॉलचं मैदान झालं Romantic! मॅनेजरने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, टीमने केली मदत

मागील आठवड्यात 26 तारखेला ही भेट होणार होती. मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण राज्यपाल चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेले होते. दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर ते उत्तराखंड इथं गेले होते. उत्तराखंडाचा दौरा करून आल्यानंतर राजभवनाकडून भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला आमदारांचा मुद्या मार्गी लागतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:

Tags: उद्धव ठाकरे, राज्यपाल