मुंबई 01 नोव्हेंबर: सर्वात मोठा सण असलेली दिवाळी (Diwali)आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या काळात गर्दीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा (Cronavirus) घसरता आलेख कायम ठेवण्याचं आव्हान राज्य सरकार समोर आहे. सलग गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या संख्येत घट होत आहे. रविवारी (1 नोव्हेंबर) 3 हजार 726 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 14 हजार 079 एवढी झाली आहे. तर Recovery Rate 89.92वर गेला आहे.
दिवसभरात राज्यात 5 हजार 369 रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 83 हजार 775 एवढी झाली आहे. तर 113 जणांचा मृत्यू झाला.
रुग्णांची संख्या कमी होत आहे तर व्यवहार वाढत आहेत. लोकांमधलं गांभीर्य कमी होत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ करणे या त्रिसुत्रीवरच दुसरी लाट थोपवणं शक्य आहे असं तत्ज्ञांचं मत आहे.
2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत भारतातील नागरिकांसाठी स्वदेशी लस उपलब्ध असेल अशी माहिती भारत बायोटेक कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या कंपनीचे लक्ष्य देशभरातील लसीची टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे.
कोरोना रिटर्न! फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा 4 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन
भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्ट्रेनमधून तयार केली आहे.
शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ही लस नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या लशीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सध्या सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus