रविवारी जम्बो ब्लॉक, दादर-सीएसएमटी वाहतूक बंद

रविवारी जम्बो ब्लॉक, दादर-सीएसएमटी वाहतूक बंद

ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे.

  • Share this:

03 फेब्रुवारी : मध्य रेल्वेवरील परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर रविवार, ४ फेब्रुवारीला विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे. गर्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडित करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांपुरता हा प्रवाह खंडित करण्यात येणार आहे. ही कामे रात्री करणे कठीण असल्याने रविवारचा दिवस निवडण्यात आला आहे.

पाहूयात या मेगाब्लॉकमुळे वाहतुकीवर कसा परिणाम होणार आहे..

- सर्व 4 ट्रॅक बंद राहणार

- फास्ट ट्रॅक - सकाळी 8:30 ते दु. 4:30 पर्यंत बंद

- स्लो ट्रॅक - सकाळी 9:30 ते दु. 3:30 पर्यंत बंद

- ब्लॉकच्या वेळी सर्व लोकल कुर्ला किंवा दादरपर्यंतच धावतील

- दादर, कुर्ला, ठाण्याहून सुटणाऱ्या गाड्यांवर परिणाम नाही

- हार्बर लाईनवर मेगाब्लॉक नाही

- मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हार्बरवरून प्रवास करण्याची मुभा

पाहूयात  सीएसएमटीपासून पहिली आणि शेवटची गाडी कधी सुटेल ते

ब्लॉक सुरू होण्याआधी

- अप फास्ट मार्गावर दादरहून शेवटची लोकल सकाळी 8.12 वा.

- अप स्लो मार्गावर दादरहून शेवटची लोकल सकाळी 9.00 वा.

- डाऊन फास्ट मार्गावर सीएमएमटीहून शेवटची लोकल सकाळी 9.12 वा.

- डाऊन स्लो मार्गावर सीएमएमटीहून शेवटची लोकल सकाळी 9.05 वा.

First published: February 3, 2018, 3:20 PM IST

ताज्या बातम्या