मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Corona update : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक, शनिवारी मोठा आकडा समोर!

Corona update : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक, शनिवारी मोठा आकडा समोर!

पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोव्हिड चाचणी करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 1 जानेवारी :  आज वर्षाचा पहिला दिवस आहे. एकीकडे नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. तर दुसरीकडे मात्र चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया या सारख्या देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोव्हिड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीमध्ये शनिवारी तब्बल 53 प्रवासी हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परदेशातून येणारे प्रवाशी मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्यानं सरकारची चिंता वाढली आहे.

केंद्राचं राज्यांना पत्र  

दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य सचिवालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे, मात्र दुसरीकडे येत्या काळात मोठ्याप्रमाण सणोत्सव आहेत, या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो यासाठी राज्यांनी काय काळजी घ्यावी हे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा :  Corona Virus : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक, कोरोनाचा XBB15 व्हेरियंट, जगभरात हाहाकार माजवणार

अनेक मंदिरात मास्क सक्ती  

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांकडून भाविकांना मास्क वापरण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. दर्शन रांगेत मास्कचा वापर करावा तसेच योग्य अंतर ठेवावे असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर, अशा अनेक मंदिरांनी भाविकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

First published:

Tags: Corona, Covid-19