• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • महिलांनो टेन्शन फ्री करा प्रवास; आता एका क्लिकवर शौचालय होणार उपलब्ध

महिलांनो टेन्शन फ्री करा प्रवास; आता एका क्लिकवर शौचालय होणार उपलब्ध

या App च्या मदतीने पहिल्या टप्यात मुंबईतील 500 शौचालयं खुली केली आहेत.

 • Share this:
  मुंबई, 09 मार्च: प्रवासात आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना घराबाहेर पडल्यानंतर जर वॉशरूमला जायचं असेल, तर अनेक अडचणी येतात. वॉशरूमच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे एकही ठोस योजना नाही. त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजानिक ठिकाणी असलेल्या वॉशरुमधील असुविधा आणि अस्वच्छता पाहाता महिला अशा ठिकाणी जाण्याच टाळतात. त्यामुळे सुरक्षित शौचालय सापडेपर्यंत त्यांना दैनंदिन क्रियाविधी रोखून धरावी लागते. पण आता या प्रवासातील आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी असणाऱ्या 'वोलू'ने एक अनोखं मोबाइल App लॉन्च केलं आहे. या App च्या माध्यमातून महिलांना शहरातील सर्वात जवळचं वॉशरूम सुविधा शोधण्यात मदत होणार आहे. यामुळे शहरातील अनोळखी ठिकाणी गेल्यानंतरही शौचालय शोधत फिरायची गरज भासणार नाही. ही सुविधा मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नोकरदार महिलांसाठी हे App अधिक फायदेशीर ठरणार आहे. घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयं शोध फार कठीण काम असतं. अशावेळी अनेक महिला लघुशंकेला येईल या भीतीने पाणी पिणं देखील टाळतात. तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहे अनेकदा अस्वच्छ असतात. अशावेळी अनेकदा महिला लघुशंकेला जाणं टाळतात. यामुळे अनेक आजार बळावतात, या समस्येला डोळ्यासमोर ठेऊन वोलू ॲपनं ही सुविधा विकसीत केली आहे. सध्या ही सुविधा मुंबईपुरतीच मर्यादीत आहे. पण येणाऱ्या काळात ही सुविधा देशभर उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. हे ही वाचा - असाही Women's Day! पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर महिला बातम्या सांगणार; उद्यापासून तश्नुवा ऑन एअर वोलू App गुगल मॅपच्या आधारे महिलांना जवळच्या स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची माहिती देणार आहे. Woloo अ‍ॅश्युरन्स (डब्ल्यूएएच) प्रमाणित प्रसाधन सुविधा कुठे आहे, हे शोधण्यास मदत करणार आहे. महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयं मिळावीत, यासाठी कंपनीनं टॉयलेट बोर्ड कोलिशन (टीबीसी) ने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे महिलांसाठी अनेक खाजगी हॉटेल, मिटिंग हॉल अशा विविध ठिकाणची शौचालयं खुली करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती हॉटेल चालक विजय यांनी दिली आहे. हे ही वाचा - पावसाळ्यात गर्भवती महिलांनी 5 गोष्टींची घ्यावी काळजी या App च्या मदतीने पहिल्या टप्यात मुंबईतील 500 शौचालयं खुली केली आहेत. आगामी काळात 100 मेट्रो शहरांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. वोलू हे भारतातील पहिलं App आहे. ज्यामुळे महिलांना स्वच्छतेचं प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या शौचालयांचा वापर करता येणार आहे. हे App सध्या कोरोना वॉरियर्ससाठी मोफत आहे, तर सामान्यांना यासाठी 99 रूपये मोजावे लागतील, अशी माहिती वोलू App चे व्यवस्थापक अमित अरोन्डेकर यांनी दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: