मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आता मुंबईकर रात्रभर जागणार, आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

आता मुंबईकर रात्रभर जागणार, आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे.

24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे.

24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे.

मुंबई, 17 जानेवारी : मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे. 24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. कारण, मुंबईच्या आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे रहावं असं वाटतंय का असा सवालही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संगमनेर इथं आज तरुणाईला विशेष मेजवानी देण्यात आली होती. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा-2020 युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमाचं आयोजन संगमनेर इथं करण्यात आलं होतं. त्यात विविध पक्षांच्या तरुण आमदारांची मुलाखत अभिनेते अवधूत गुप्ते यांनी घेतली. या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, आदिती तटकरे, आणि झिशान सिद्धीकी, ऋतुराज पाटील यांनी सहभाग घेतला. सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली. यात लक्षवेधी ठरलं ते शेवटच्या भागात जादूच्या फोनवरून आपली इच्छा होईल त्या व्यक्तीशी बोलण्या अभिनय करण्याचा राऊंड. अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. इतर बातम्या - मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांच्याशी बोलण्याचा फोनवरून बोलण्याचा उत्तम अभिनय केला. ते म्हणाले, तुम्हा सगळ्यांशी बोलताना मला आनंद होतोय. महाराष्ट्रात महाघाडीचं सरकार आलं आहे. ते सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीने चालेल अशी काळजी घ्या. आदित्य ठाकरेंच्या या खास फोन कॉलवर सगळ्या तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. यावेळी सगळ्यांनी आदित्य ठाकरेंना लग्नावरून टोमणेही मारले. इतर बातम्या - निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर पण... तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलण्याचा केलेला अभिनयही असाच लक्षवेधी ठरला. त्यांच्यातलं संभाषण असं झालं...रोहित पवार म्हणाले, मोदी साहेब मी राहित पवार बोलतोय. तुम्ही ओळखलंच असेल. केंद्रात तुमचं सरकार येवून आता वर्ष होईल. तरुणाईला जास्तीत नोकऱ्या कशा मिळतील याची काळी घ्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आलीय त्यामुळे मागच्या पाच वर्षात विकास झाला नाही ते विकास आता होईल. इतर बातम्या - फडणवीसांचे विश्वासू आमदार अजित पवारांच्या भेटीला, चर्चेला उधाण
First published:

Tags: #Mumbai, Aaditya thackeray

पुढील बातम्या