Home /News /mumbai /

शिर्डीला जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट; 30 प्रवाशांचा कसा वाचवला जीव, पाहा LIVE VIDEO

शिर्डीला जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट; 30 प्रवाशांचा कसा वाचवला जीव, पाहा LIVE VIDEO

माजीवडा या भागात धावत्या बसने पेट घेतला. यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने सर्व 30 प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले.

    ठाणे, 5 जानेवारी : मुंबईजवळील ठाण्यात (Thane Firing Bus) एका चालत्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच बस आगीत खाक झाली. सांगितलं जात आहे की शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला होता. या दरम्यान बस चालकाने सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. ही बस गोरेवावहून शिर्डीला जात होती. या घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडच्या गाडीला बोलावण्यात आलं. अनेक तासांनंतर फायब्रिगेडला या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. गोरेगावहून शिर्डीला जाणाऱ्या या खासगी बसमध्ये तब्बल 30 प्रवासी प्रवास करीत होती. धावत्या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. माजीवडा या भागात धावत्या बसने पेट घेतला. यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने सर्व 30 प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. भररस्त्यात पेट घेणाऱ्या बसचा थरार पाहून परिसरात खळबळ उडाली. बस पेट घेत असल्याचे पाहून वाहकूत पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही बचाव कार्य सुरू केले. बसजवळील सर्व वाहनांना हटविण्यात आले व अनेक तास सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. वेळीच प्रवाशांना खाली उतरविल्यामुळे मोठा अपघात टळल्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे.
    First published:

    Tags: Mumbai News

    पुढील बातम्या