'एप्रिल फुल बनाया',ओलाने दिलं चक्क 149 कोटींचं बिल !

'एप्रिल फुल बनाया',ओलाने दिलं चक्क 149 कोटींचं बिल !

अॅप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या ओलाने एका ग्राहकाला चक्क 149 कोटी रुपयांचं बिल दिलं.

  • Share this:

05 एप्रिल :  बघितलं, तर 1 एप्रिलला जो कोण तो थट्टा मस्करी करण्याच्या मूडमध्ये असतो. पण मुंबईत राहणाऱ्या सुशील नरसियांसोबत 1 एप्रिलला असा प्रकार घडला, जो ते आयुष्यात विसरणार नाहीत.

अॅप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या ओलाने एका ग्राहकाला चक्क 149 कोटी रुपयांचं बिल दिलं. एरवी ही घटना एप्रिल फुल समजली गेली असती पण राईडच्या शेवटी त्याच्या मोबाईल वॉलेटमधून 127 रुपये काढून घेतले, आणि उर्वरित रक्कम भरेपर्यंत ओला कॅबची सेवा घेता येणार नाही, अशा स्वरुपाचा संदेशही कंपनीने सुशीलला पाठवून दिला.

सुशील नरसीन यांनी मुलुंड पश्चिममधील त्यांच्या घरापासून वाकोला मार्केटसाठी ओला कॅब बुक केली. पण ड्रायव्हरला त्यांचं घर सापडत नव्हतं, कारण त्याचा फोन बंद पडला होता. त्यानंतर सुशील स्वत:च ड्रायव्हरच्या दिशेने चालत गेले. परंतु ड्रायव्हरने राईडच रद्द केली. राइडचे बुकिंग रद्द झाल्याचे लक्षात आल्याने सुशील यांनी दुसऱ्यांदा कार राइड बुक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे झालं ते पाहून ते थक्कच झाला.

ओला कडून त्यांना  1,49,10,59,648 रुपयांचे बिल पाठवण्यात आलं होतं. सुरूवातीला सुशील यांना हा एक एप्रिल फुल प्रँक असल्याचं वाटलं पण मोबाईल वॉलेटमधून 127 रुपये वजा करून 1,49,10,59,648 रुपयांची थकबाकी असल्यानं नवी कॅब बुक करता येणार नसल्याचं 'ओला'ने सुशील यांना कळवलं.

या सर्व प्रकारानंतर सुशील यांनी ओला कंपनीच्या सोशल मीडियाशी संपर्क केला. तेव्हा कंपनीने तांत्रिक कारणामुळे असं झाल्याचं सांगितलं आणि सुशील यांचे पैसे परत केले. तसंच 149 कोटी रुपयांच्या बिलाची तांत्रिक अडचणही दोन तासात दूर केली. पण, एवढं मोठं बिल पाहून लोकांनीही सोशल मीडियावर ओलाला ट्रोल केलं.

 

 

First published: April 5, 2017, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading