ठाणे, 28 एप्रिल: मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या (Mumbai Fire) घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात (Mumbra Hospital Fire) आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये चार रुग्णांचा मृत्यू (4 Patients Died) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंब्रा याठिकाणी असणाऱ्या कौसा परिसरात एम एस प्राइम क्रिटीकेअर (M/s. Prime Criticare Hospital) रुग्णालयामध्ये ही आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर हे अग्नितांडव पाहायला मिळालं. घटनास्थळी मुंब्रा पोलीस, 5 रुग्णवाहिका, टोरेंट ऑफिशिअल्स, आरडीएमसी आणि फायर ब्रिगेड तीन फायर इंजिन, 2 वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू व्हेइकलसह घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
Today at around 03:40 am fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane. Two fire engines & one rescue vehicle are at the spot. Fire extinguishing underway. Four dead during shifting of patients to another hospital: Thane Municipal Corporation#Maharashtra pic.twitter.com/QR4NNYZd8Y
— ANI (@ANI) April 28, 2021
दरम्यान या रुग्णालयामध्ये एकूण 20 रुग्ण होते पैकी 6 रुग्ण हे अतिदक्षता विभागात होते. या रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलवलं जात होतं, त्यावेळी यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती. या आगीची कारणं शोधण्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईंकांन पाच लाखाची मदत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय जखमींना एक-एक लाख देण्याची घोषणा केली आहे.
(हे वाचा-नर्सने ऑक्सिजन काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांकडून तोडफोड)
हाॅस्पिटलमध्ये एकूण 20 बेड होते, त्यापैकी 14 रुग्ण जनरल वॉर्डातील तर इतर सहा रुग्ण अतिदक्षता विभागात होते. यास्मिन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47), हलिमा सलमानी (वय 70), हरीश सोनावणे (वय 57) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांची नावं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Mumbai, Thane (City/Town/Village)