मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : मराठवाड्यात Omicron ची एंट्री, लातूरमध्ये आढळला पहिला रुग्ण

BREAKING : मराठवाड्यात Omicron ची एंट्री, लातूरमध्ये आढळला पहिला रुग्ण

राज्यात आज ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. यामध्ये एक जण हा लातूर येथील प्रवासी आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 13 डिसेंबर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Coronavirus Omicron Variant)  आता महाराष्ट्रात (maharashtra) पसरत चालला आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भापाठोपाठ आता मराठवाड्यात सुद्धा ओमायक्रॉनने एंट्री केली आहे. लातूरमध्ये (latur) एका रुग्ण आढळला आहे. तर पुण्यात सुद्धा आणखी एक रुग्ण आढळला आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. यामध्ये एक जण हा लातूर येथील प्रवासी आहे. तर एक रुग्ण पुण्यातला आहे. या दोन्ही प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. तर डोंबिवलीमध्ये आढळलेला पहिला रुग्ण हा ओमायक्रॉनमुक्त झाला आहे.

बिग बॉस मराठी तीनच्या विजेत्याची धनराशी होणार शून्य, काय आहे कारण?

तर रविवारी  नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जीनोमसिक्वेन्सीसाठी रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.

ब्रिटनमध्ये पहिल्या रुग्णाचा मृत्यू

दरम्यान, ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. (UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या देशात एप्रिलपर्यंत 75 हजार कोरोना मृत्यू होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

आयएएनएसच्या (IANS) बातमीनुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSSTM) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी इंग्लंड सरकारला इशारा दिला आहे, की देशात कठोर उपाययोजना  केल्या नाहीत तर येत्या 5 महिन्यांत म्हणजे एप्रिल 2022पर्यंत इंग्लंडमध्ये 25 हजार ते 75 हजार नागरिकांचा मृत्यू (Deaths) होऊ शकतो.

First published: