Home /News /mumbai /

Omicron : मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बसेस पाठवल्या परत; शेकडो प्रवासी अडकले

Omicron : मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बसेस पाठवल्या परत; शेकडो प्रवासी अडकले

महाराष्ट्रात ओमायक्रॉनची(Omicron) प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टवर सतर्कता वाढवली आहे.

    मुंबई, 3 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai City) कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाचा (Corona Virus) मोठा विस्फोट होताना दिसत आहे. तसेच, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या (Omicron) प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. त्यांनी मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसेस परत पाठवल्या आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोविड स्क्रीनिंग वाढवण्यात आले आहे. यावेळी बसमधील प्रवाशांचे आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये बहुतांश रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे, मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या 20 हून अधिक बसेस परत पाठवण्यात आल्या. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा निर्बंध सुरू झाले आहेत. कर्नाटकमध्येही नववर्षानिमित्त रात्री कर्फ्यूसारखे नियम लागू केले असून येत्या काही दिवसांत राज्यात आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबईत कोरोना व्हायरसचे 8,063 नवीन रुग्ण आढळले, जे शनिवारी झालेल्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा 1,763 अधिक आहेत. अधिका-यांनी सांगितले की शहरात शनिवारी संसर्गाची 6,347 प्रकरणे आणि रविवारी 27 टक्के अधिक प्रकरणे आढळली. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या 578 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सध्या शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 29,819 आहे. रविवारी आढळलेल्या 89 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Karnataka, Karnataka government

    पुढील बातम्या