ओमान एअरलाईन्सच्या विमानचं मुंबईला इमर्जन्सी लँडींग, 200 प्रवासी बचावले

विमानात 200 प्रवासी होते. एक इंजिन बंद पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावर आणीबाणी घोषीत करण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 07:31 PM IST

ओमान एअरलाईन्सच्या विमानचं मुंबईला इमर्जन्सी लँडींग, 200 प्रवासी बचावले

मुंबई 3 जुलै : दमदार पाऊस आणि स्पाईस जेटचं विमान घसरल्याने विस्कळीत झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज थरार घडला. ओमान एअरलाईन्सच्या एका विमानाने टेक ऑफ घेताच त्याचं एक इंजिन बंद पडलं. त्यामुळे तातडीने हे विमान परत बोलविण्यात आलं. विमानात 200 प्रवासी होते. एक इंजिन बंद पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावर आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. सुदैवानं 10 मिनिटांमध्येच विमान सुखरुप उतरविण्यात यश आलं.

ओमान एअरलाईन्सच्या मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या विमानाने 4 वाजून 42 मिनिटांनी उड्डण घेतलं. त्यानंतर काही वेळातच विमानाचं एक इंजीन बंद झाल्याचं स्पष्ट झालं. वैमानिकाने तातडीनं मुंबई विमानतळावर संपर्क साधून विमान उतरण्याची परवानगी मागितली. गांभीर्य लक्षात घेऊन त्याला तातडीने परवानगीही देण्यात आली.

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

वैमानिकाने नेमकं काय झालं याची माहिती विमानातल्या सर्व प्रवाशांना दिली. घाबरण्याचं कुठलंही कारण नाही असंही सांगत त्याने सर्वांना धीर दिला. त्यानंतर अवघ्या 10 निमिटांमध्ये विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मोठी दुर्घटना टळली

Loading...

मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली. जयपूरहून मुंबईला आलेल्या स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 54 विमान दुसरीकडे वळवण्यात आले आहेत. तर 52 विमान रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसात विमानतळावर झालेली ही दुसरी दुर्घटना आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवरून नावासमोरचं 'काँग्रेस अध्यक्ष'पद काढून टाकलं

याआधी रविवारी रात्री सुरत विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली होती. भोपाळवून सुरतला येणारे विमान धावपट्टीवरून घसरून सेफ्टी एरिया मध्ये गेले होते. विमानाला मोठा अपघात झाला असता पण ते चिखळात अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. वैमानिकाने विमानावरील नियंत्रण सोडले नाही त्यामुळे 47 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...