मुंबई, 30 डिसेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचे (corona) रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकमध्येही ओमायक्रॉनचा (Omaicron maharashtra cases) शिरकाव झाला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे समुह संसर्ग सुरू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. आज राज्यात 198 रुग्ण आढळून आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 198 रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यामध्ये फक्त 30 जण परदेशातून आलेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळले आहेत, पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलंय. या ३८ जणांचा कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय, अशी माहिती राज्य साथरोग सर्वेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
(JOB ALERT: तुम्हीही टायपिंग उत्तीर्ण असाल तर 'या' ज़िल्हा परिषदेत जॉबची संधी)
मुंबईमध्ये आतापर्यंत १९० रुग्ण आढळले आहे तर ठाण्यात ४ रुग्ण आढळले आहे. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरीमध्ये १ रुग्ण आढळला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी ३ रुग्ण आढळून आले आहे. कल्याण डोंबिवलीतील या तिन्ही रुग्णांचा कोणत्याही परदेशी प्रवाशीची नोंद नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत सर्व रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
तर नाशिकमध्येही एक रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.
मुंबईत तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी!
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते. तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.
('या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेय..')
गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.