News18 Lokmat

ओला-उबर चालक 17 नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाणार

इन्सेटिव्ह योजना लागू करण्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांनी दिलेलं आश्र्वासनाची पूर्तता न झाल्याने ओला-उबर चालक-मालक संघटनेनं परत संपावर जाण्याचं हत्यार उपसलंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 08:34 AM IST

ओला-उबर चालक 17 नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाणार

मुंबई, 14 नोव्हेंबर : ओला-उबर चालक गुरुवार 17 नोव्हेंबरपासून परत संपावर जाणार आहेत. दिवाळीपर्वी 12 दिवस संपावर गेलेल्या ओला-उबर चालकांसोबत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी इन्सेटिव्ह योजना लागू करण्यासंदर्भात आश्र्वासन दिलं होतं, पण त्याची पूर्तता झाली नसल्याने ओला-उबर चालकांनी परत संपाचं हत्यार उपसलं आहे.


ओला उबर चालक 17 नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचं हत्यार उपसणार आहेत. कारण 12 दिवसाच्या संपानंतर दिवाळी आधी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत ओला-उबर चालकांची बैठक झाली होती. यात 17 नोव्हेंबरपर्यंत इन्सेटिव्ह योजना लागू करण्याबाबत चर्चा झाली. पण 17 नोव्हेंबरची डेडलाईन देऊनही कंपन्यांनी ती आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप ओला उबर चालक-मालक संघटनेनं केलाय. फसवणूक झाल्याचा आरोप करत संघटनेनं आधीच दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्यापासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान कॅबचालकांना चांगला परतावा मिळावा, ऑनलाईन कॅबचं किमान भाडं 100 ते 150 रुपये असावं, प्रति किलोमीटर 18 ते 23 रुपये भाडं लावावं, तसंच नवीन गाड्या न घेता आहे त्या कॅब चालकांना समान काम मिळावं या ओला उबर चालकांच्या मागण्या आहेत.

Loading...


आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या कंपन्यांनी फसवणूक केल्याचा आरोप ओला उबर चालक-मालक संघटनेनं केला असून, शनिवारी विकेंडपासून परत ते संपाचं हत्यार उपसणार असल्यामुळे सर्वसामान्या प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांची चिंता वाढली आहे. तर इन्सेटिव्ह योजना लागू करण्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय.


VIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...