S M L

ओला टॅक्सीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपींना अटक

मीरा रोड येथील काशीमिरा इथे एका तरूणीवर ओला टॅक्सीचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरेश पांडुरंग गोसावी (वय ३२) असे टॅक्सी चालकाचे नाव तर उमेश जसवंत झाला (वय ३१) हे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

Sonali Deshpande | Updated On: Dec 24, 2017 12:58 PM IST

ओला टॅक्सीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपींना अटक

24 डिसेंबर : मीरा रोड येथील काशीमिरा इथे एका तरूणीवर ओला टॅक्सीचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरेश पांडुरंग गोसावी (वय ३२) असे टॅक्सी चालकाचे नाव तर उमेश जसवंत झाला (वय ३१) हे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही महिला ठाणे  इथे घरी जाण्यासाठी काशिमीरा पोलीस ठाण्यासमोरील बस स्थानकाजवळ थांबली होती. तेथे ती या ओला कॅबमध्ये बसली. त्यावेळी कारमध्ये चालकासह आणखी एक जण बसला होता. महिलेला धाक दाखवून तिच्याकडील रोख, अंगावरचे दागिने तसेच डेबिट कार्ड त्यांनी काढून घेतले. त्यानंतर चालकाने तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून संबंधित चालकाने ओलाचे बुकिंग घेणे बंद केले होते, अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. घटनेत ओलाकडून सांगण्यात येतंय की ही गाडी ऑफलाईन होती आणि पीडितेने ही बुकिंगही ऑफलाईन केली होती. म्हणजे, ओलाच्या माध्यमातून गाडी बुक केली गेली नाही.. पीडित महिलेनं ती हात दाखवून थांबवली, आणि गाडीत बसली, असा ओलाचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 12:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close