ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रात, 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये !

ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रात, 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये !

अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 किमीवर स्थित आहे.

  • Share this:

02 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये धुडगूस घातलेल्या ओखी वादळ आता महाराष्ट्राच्या दिशेनं कूच केलीये. त्यामुळे खबरदारी म्हणून 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिलाय.

अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 किमीवर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनार्‍यांवरील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे.

मुंबईसह सागरी किनाऱ्यावर 4 तारखेला अंशत: तसंच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वाऱ्याची तीव्रता अधिक असेल. त्याही दृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल. असं आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 10:35 PM IST

ताज्या बातम्या