मुंबईला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता

मुंबईला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता

अरबी समुद्रात ओखी नावाचं चक्रीवादळ तयार झालंय. हे वादळ मुंबईच्या समुद्रापासून 1000 किमीवर असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ओखी वादळाचा तडाखा बसलेल्या, केरळ आणि तमिळनाडूतील सुमारे एक हजार मच्छिमारांनी सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आश्रय घेतला आहे.

  • Share this:

03 डिसेंबर:  मुंबईलगतच्या अरबी समुद्राला 4 आणि 5 डिसेंबरला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रात ओखी नावाचं चक्रीवादळ तयार झालंय. हे वादळ मुंबईच्या समुद्रापासून 1000 किमीवर असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ओखी वादळाचा तडाखा बसलेल्या, केरळ आणि तमिळनाडूतील सुमारे एक हजार मच्छिमारांनी सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आश्रय घेतला आहे.

केरळ तामिळनाडूमध्ये थैमान घातलं होतं.  ओखी वादळ मुंबईच्या समुद्राकडे येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळं मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ओखी वादळानं तामिळनाडूमध्ये चौदा लोकांचा बळी घेतलाय. सुरक्षेचा पर्याय म्हणून मासेमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणल्यात. मात्र अजूनही अनेक बोटी समुद्रात दुरलर गेल्यानं त्यांच्यापर्यंत माहिती पोहचू शकलेली नाही. त्या बोटी या वादळापासून वाचवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी मागणी मच्छिमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading