बुचर आयलंडवर आग लागलेली डिझेलची टाकी झुकली

बुचर आयलंडवर आग लागलेली डिझेलची टाकी झुकली

आग लागलेल्या १३ नंबर टाकीत अजूनही ३ मीटर उंचीपर्यंत तेलसाठा शिल्लक आहे.

  • Share this:

मुंबई,08 आॅक्टोबर : बुचर आयलंडवर आग लागलेली टाकी समुद्राच्या बाजूला झुकली. आग लागलेल्या १३ नंबर टाकीत अजूनही ३ मीटर उंचीपर्यंत तेलसाठा शिल्लक आहे.

आग लागल्यामुळे तेलासाठा असलेली स्टेनलेस स्टीलची टाकी गेले ४० तास ३५० डिग्री तापमानामुळे वितळू लागली आहे. त्यामुळे शेजारील इतर तेलटाक्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आग लागलेल्या टाकीत जळतं तेल जर बाहेर पसरलं तर मोठं सकंट निर्माण होईल.

शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता, त्यावेळी बुचर आयलंडवरील भारत पेट्रोलियमच्या टँकफार्मवर वीज कोसळली.  या आगीची भीषणता येवढी मोठी आहे की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नौदलाचीही मदत घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 01:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...