घोडबंदर रोडवर तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला, बोरिवलीच्या दिशेची लेन बंद

घोडबंदर रोडवर तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला, बोरिवलीच्या दिशेची लेन बंद

पाटलीपाडा भागात वाघबीळ ब्रिजवर तेल वाहून नेणारा कंटेनर उलटला आहे. त्यामुळे ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी लेन पूर्णपणे बंद झाली आहे.

  • Share this:

22 मार्च : ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पाटलीपाडा भागात वाघबीळ ब्रिजवर तेल वाहून नेणारा कंटेनर उलटला आहे. त्यामुळे ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी लेन पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.

दरम्यान, समोरच्या लेनमधून बोरिवलीकडे हळूहळू गाड्या सोडल्या जात आहेत. पण संपूर्ण रस्त्यावर तेलच तेल सांडलं आहे. जेएनपीटीहून हा कंटेनर सिलव्हासाकडे निघाला होता. त्याचदरम्यान तो उलटला आणि त्यातलं तेल सगळीकडे पसरलं आहे.

First Published: Mar 22, 2018 09:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading