बापरे...डोंबिवलीत पडला 'तेला'चा पाऊस!

बापरे...डोंबिवलीत पडला 'तेला'चा पाऊस!

नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली 8 सप्टेंबर : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज चक्क ऑईल मिश्रित पाऊस पडला. एमआयडीसी भागात पडलेल्या पावसाच्या पाण्यावर चक्क तेलाचे तवंग आढळून आले. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत.

त्यातच आज सकाळी डोंबिवली एमआयडीसी भागात पाउस पडत असताना या पाण्यावर तेलाचा तवंग असल्याचं काही ठिकाणी आढळून आलं. या पाण्याचे नमुनेही घेऊन ठेवण्यात आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार प्रदूषणामुळेच घडल्याचा स्थानिकांचा दावा असून आसपासच्या कंपन्यांमधून सोडला जाणारा एखादा वायू पाण्याच्या संपर्कात आल्यानं पावसाच्या पाण्यावर हा तवंग आल्याची शक्यता आहे. त्यामुळं आता याप्रकरणी लवकरात लवकर तपास करून प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याची मागणी करण्यात येतेय.

उदयनराजे उद्या देणार खासदारकीचा राजीनामा? लवकरच या पक्षात करणार प्रवेश

कोल्हापूरात धोक्याचा इशारा

कोल्हापूर आणि सांगली भागात असणार्‍या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीची पूर पातळी वाढते आहे. त्यामुळे सरकार आधीच सतर्क झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, आलमट्टी प्रशासनासोबत बोलणं झालं आहे. त्यानुसार आलमटी धरणातून 2 लाखांहून अधिक पाणी सोडण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वीची पूर परिस्थिती लक्षात घेता, कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

गडचिरोलीच्या महापूरात अडकलेल्या 4 जणांसह 500 मेढ्यांची थरारक सुटका!

या सर्व भागावर राज्यसरकारचं लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचंही  चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमासाठी पाटील हे आले होते. या कार्यक्रमानंतर कोल्हापूर आणि सांगली भागात पूर परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सरकार करत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

पावसाची स्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिखली ग्रामस्थांचं प्रशासनाने स्थलांतर केलंय. जिल्हा प्रशासनाकडून चिखली आंबेवाडी ग्रामस्थांसाठी आदेश काढण्यात आला होता. पाणी पातळी वाढत असल्याने गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. जनावरांसह संसारोपयोगी साहित्य घेऊन गावकरी गावातून बाहेर आले. आधीच्या महापूरावेळी चिखली आणि आंबेवाडी गावांना सर्वात मोठा फटका बसला होता. या ठिकाणी जिल्ह्यातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवले होतं.

First published: September 8, 2019, 9:11 PM IST

ताज्या बातम्या