राजकीय घडामोडींना वेग.. काँग्रेसच्या विधिमंडळनेतेपदी 'या' नेत्याची निवड

राजकीय घडामोडींना वेग.. काँग्रेसच्या विधिमंडळनेतेपदी 'या' नेत्याची निवड

बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) आधी हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली

  • Share this:

मुंबई,26 नोव्हेंबर: काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत ही घोषणा केली. बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) आधी हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील 24 तासांत नेमके काय करायचे याबाबत मल्लिकार्जून खर्गे यांनी आमदारांना सूचना दिल्या.

दरम्यान, शिवसेनेचे विधिमंडळनेतेपदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. उद्या, 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे बहुमतचाचणीचे मतदान गोपनिय न घेता ते लाइव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सरकारला देण्यात आले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आता फडणवीस सरकारकडे 30 तासांचा अवधी उरला आहे.

अजितदादांसमोर उरले 'हे' 2 पर्याय

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अजित पवार यांच्यासाठी दोन पर्याय शिल्लक आहेत. पक्षात परत या..अन्यथा निलंबन, शरद पवार यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. अजित पवार यांना पक्षातून निलंबित करावे लागणार आहे. अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांचा पक्षाशी संबंध नाही, या बाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माहिती द्यावी लागणार आहेय. म्हणजेच गटनेता हा मुद्दा समोर येणार नाही.

पवारसाहेब 'हिमालय' तर अजितदादा 'सह्याद्री'

अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचा एक गट सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे.अजित पवार उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार करणार असल्याची माहिती एनसीपी के प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी दिली आहे. अजितदादांसोबत अनेक आमदार आहेत.ते फ्लोअर वरच दिसेल. अजितदादांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी भान ठेवावं. त्यांना उद्या महाराष्ट्रात फिरायचे आहे. अनेकांना अजितदादा भेटत आहे. शरद पवार साहेब हे हिमालय आहे आणि त्यांच्यासाठी सह्याद्री कधीही धाऊन जाईल, असेही मंगलदास बांदल यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 12:48 PM IST

ताज्या बातम्या